Monday 26 October 2015

दगड

दगड ।।
दगडातच देव पाहतात लोकं
दगडालाच फुलं वाहतात लोकं
दगडाला फोडण्या मायेचा पाझर
दगडाला न्हाऊ घालतात लोक

दगडाला पेढे, दगडा भोवती वेढे
दगडावर दही दुध सांडतात लोकं
ज्याचा त्याचा आपला वेगळा दगड
दगडापायी ईथे भांडतात लोकं

दगडाची पुजा,दगडाचीच भक्ति
दगडापुढे टेकून वाकतात लोक
माणसातली माणूसकी भले उघडी
दगडाशी मात्र ईमान राखतात लोक

दगडाला शेंदूर, दगडाचे मंदिर
दगडाचे ओझे वाहतात लोकं
दगडाची वस्ती, दगडाचे काळीज
दगडाचेच ईथे राहतात लोकं⁠⁠ .

- संत गाडगे महाराज