Thursday, 5 November 2015

अंतर्मुख

भारत नको त्याच गोष्टीत अव्वल आहे.
.
.
शुध्द संस्कृतीच्या नावाने हुशारकी मिळवणार्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक कशी काय हा प्रश्न संस्कृती रक्षकांना पडत नाही.
.
.
लोकसंख्येला अाळा बसावा यासाठी आमच्या कडे काहीच उपायोजनात्म कार्यक्रम नाही.
.
.
माञ ट्रेन गच्च भरलेली दिसली तर आम्ही उपरोधाने म्हणतो साला एवढे लोक रोज कुढून येतात.
.
.
अजून कशा कशासाठी रांगा लावाव्या लागणार आहेत माहित नाहीत.
.
.
तुमचेच दात आणि तुमचेच ओठ.
आणि तुमच्याच वागण्यात आहे खोट.
.
.
Feeling �� सवय झाली रे आता..
(मनाला स्पर्श करणार)
-श्री

Monday, 26 October 2015

दगड

दगड ।।
दगडातच देव पाहतात लोकं
दगडालाच फुलं वाहतात लोकं
दगडाला फोडण्या मायेचा पाझर
दगडाला न्हाऊ घालतात लोक

दगडाला पेढे, दगडा भोवती वेढे
दगडावर दही दुध सांडतात लोकं
ज्याचा त्याचा आपला वेगळा दगड
दगडापायी ईथे भांडतात लोकं

दगडाची पुजा,दगडाचीच भक्ति
दगडापुढे टेकून वाकतात लोक
माणसातली माणूसकी भले उघडी
दगडाशी मात्र ईमान राखतात लोक

दगडाला शेंदूर, दगडाचे मंदिर
दगडाचे ओझे वाहतात लोकं
दगडाची वस्ती, दगडाचे काळीज
दगडाचेच ईथे राहतात लोकं⁠⁠ .

- संत गाडगे महाराज