मोदींने अॅप द्वारे ज्या ५ लाख लोकांचा सर्वे घेतला आणि त्यात जे दहा प्रश्न विचारले त्यांच्या उत्तरांच्या पर्यायात नाही हा पर्यायच नव्हतो.
.
तरी ही १००% मिळण्या ऐवजी फक्त ९३% मिळाले. त्यात ही उड्या मारत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ५ लाख ही देश कम मोदी भक्त होते.
.
अश्चर्य याचे वाटते की, १२५ कोटी जनतेच्या मुल्यमापनात ५ लाख म्हणजे १% ही होत नाही.
.
feeling घोर कलयुग आएगा, कव्वा मोती खाएगा
-श्री
Shrikant.Jagtap
रिअॅक्ट न होता मरण्यापेक्षा रिअॅक्ट होऊन मेलेलं केव्हा ही चांगलं
Thursday, 24 November 2016
देश कम मोदी भक्त
Thursday, 5 November 2015
अंतर्मुख
भारत नको त्याच गोष्टीत अव्वल आहे.
.
.
शुध्द संस्कृतीच्या नावाने हुशारकी मिळवणार्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक कशी काय हा प्रश्न संस्कृती रक्षकांना पडत नाही.
.
.
लोकसंख्येला अाळा बसावा यासाठी आमच्या कडे काहीच उपायोजनात्म कार्यक्रम नाही.
.
.
माञ ट्रेन गच्च भरलेली दिसली तर आम्ही उपरोधाने म्हणतो साला एवढे लोक रोज कुढून येतात.
.
.
अजून कशा कशासाठी रांगा लावाव्या लागणार आहेत माहित नाहीत.
.
.
तुमचेच दात आणि तुमचेच ओठ.
आणि तुमच्याच वागण्यात आहे खोट.
.
.
Feeling सवय झाली रे आता..
(मनाला स्पर्श करणार)
-श्री
Monday, 26 October 2015
दगड
दगड ।।
दगडातच देव पाहतात लोकं
दगडालाच फुलं वाहतात लोकं
दगडाला फोडण्या मायेचा पाझर
दगडाला न्हाऊ घालतात लोक
दगडाला पेढे, दगडा भोवती वेढे
दगडावर दही दुध सांडतात लोकं
ज्याचा त्याचा आपला वेगळा दगड
दगडापायी ईथे भांडतात लोकं
दगडाची पुजा,दगडाचीच भक्ति
दगडापुढे टेकून वाकतात लोक
माणसातली माणूसकी भले उघडी
दगडाशी मात्र ईमान राखतात लोक
दगडाला शेंदूर, दगडाचे मंदिर
दगडाचे ओझे वाहतात लोकं
दगडाची वस्ती, दगडाचे काळीज
दगडाचेच ईथे राहतात लोकं .
- संत गाडगे महाराज